मनवा नाईक
नॅशनल मराठी न्यूज़
04-09-2023 12:24:12
ऋषी कपूर हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक होता. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.