आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 खेड

‘‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’’ अंतर्गत केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा.

रिपोर्टर   25-06-2023 19:43:49   1351

          श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथे शिरुर लोकसभा मतदार संघातील ‘‘मोदी@9 महा-जनसंपर्क अभियान’’ अंतर्गत केंद्रीय मंत्री श्री. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा झाली.

              यावेळी आमदार मा.महेश दादा लांडगे,जिल्हाध्यक्ष श्री. गणेश भेगडे, समन्वयक ॲड. श्री. धर्मेंद्र खांडरे, विस्तारक श्री.श्रीकृष्ण देशमुख, विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. अतुलभाऊ देशमुख, श्री. प्रदीप कंद, सौ. आशा बुचके, सौ. जयश्री पालांडे, श्री. योगेश टिळेकर, श्री. विकास डोळस यांच्यासह खेड, जुन्नर, आंबेगाव, मंचर, हडपसर आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

            पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत केलेली विकासकामे आणि कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला .


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती