इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा या ठिकाणी
वर्षाविहारासाठी आलेले, दोघे वाहून गेले…
मावळ, पुणे : श्रावण महिना आता सुरु झाला आहे. राज्यात मुसळधार पाऊस नसला तरी काही ठिकाणी श्रावण सरी सुरु आहेत. या श्रावण सरींचा आनंद घेण्यासाठी आठ ते नऊ मित्र इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा या ठिकाणी वर्षाविहारासाठी आले. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न घेता चौघे जण पाण्यात उतरले. मग प्रवाहाबरोबर वाहू लागले. दोघे जणांना त्यावेळी वाचवण्यास यश आले. पण इतर दोघे वाहून गेले. २४ ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती. बचाव पथकाने तब्बल ४८ तास शोध मोहीम राबवली.
चिंचवड येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा महाविद्यालयामधील आठ, नऊ मित्रांनी वर्षा विहारीसाठी सहलीचे आयोजन केले होते. हे सर्व जण लोकलने बेगडेवाडी येथे आले. त्यानंतर कुंडमळा येथे पोहचले. यावेळी त्यांच्यापैकी चार जण पाण्यात उतरले. परंतु पाण्याचा प्रवाहाचा अंदाज त्यांना आला नाही. ते पाण्याबरोबर वाहू लागताच दोघांना वाचवले गेले. परंतु अनिकेत वर्मा (वय 17) आणि अशोक गुलाब चव्हाण (वय 17, रा. चिंचवड) पाण्यासोबत वाहून गेले.