मुंबईत कोरोना व्हायरसचा आलेख उंचावला;
१०० हून अधिक रुग्णांच्या संख्येत वाढ
मुंबई ( प्रतिनिधी ) : मुंबई ही भारतातील महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्ये कोरोना व्हायरसचा आलेख उंचावला आहे. कोरोनाची लागण झालेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १०० हून अधिक आहे. गेल्या आठवड्यात ए वॉर्ड आणि बी वॉर्ड वगळला तर इतर २२ वॉर्डांमध्ये कोविडचे एक आणी दोन अंकी रुग्ण आढळले आहेत.
सक्रीय रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे. गेल्या एका आठवड्यात मुंबईमध्ये कोविड ने पुन्हा एकदा डोके वर काढले असून पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान मुंबई मध्ये १०७ नवीन रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी नऊ जण आयसीयू मध्ये आहेत तर एक जण व्हेंटिलेटर वर आहे.
गेल्या एका आठवड्यात मुंबईत २४ पैकी २२ वॉर्डां कोविडचे रुग्ण आढळून आले आहेत. वांद्रे पश्चिम म्हणजेच ए वॉर्ड मध्ये १३ रुग्ण आढळून आले आहेत. डी वर्ड येथे १२ रुग्ण. के पश्चिम मध्ये आठ रुग्ण, के पूर्वमध्ये बारा रुग्ण, इ वॉर्डंमध्ये आणी ए वर्ड मध्ये ६ रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत बॉम्बे रुग्णालयाचे सल्लागार फिजिशियन असलेले डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की युके आणि युएस मध्ये कोविडचे रुग्ण वाढत आहेत. यात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या प्रकारे स्वाइन फ्लूची संख्या कोणत्याही वर्षात वाढते याच प्रकारे कोविड बाबतीतही आपण तेच पाहू शकतो