आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 खेड

टाकळकरवाडी केंद्रशाळेचा लोकनृत्य स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*

बाळासाहेब सांडभोर.   10-02-2024 14:08:41   252

टाकळकरवाडी केंद्रशाळेचा लोकनृत्य  स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक*

राजगुरुनगर :- (वार्ताहार ) बाळासाहेब सांडभोर.

नुकत्याच पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेमध्ये  लहान गटात टाकळकरवाडी शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवला. तर राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत राज्यात चतुर्थ क्रमांक आला आहे केंद्र स्तरापासून ते जिल्हास्तर राज्यस्तरा पर्यंतची विद्यार्थ्यांची ही घोडदौड वाखाणण्याजोगी आहे.विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व कलागुणांना वाव देण्याचे कार्य शिक्षक करत आहे.दरम्यान खेड पं.स.चे गटविकास अधिकारी विशाल शिंदे व गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी सर्व विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे यशा बद्दल अभिनंदन केले.

  मुख्याध्यापक संजीवनी टाकळकर, मार्गदर्शक मंदा आदक, प्रगती रेटवडे, अनिता डावरे,सुरेश आदक,दीपक रेटवडे,प्रगती बनकर, मनीषा देवरे, शमीम इनामदार, पुनम मुळूक, सुंदर टाकळकर, आदिमाया बोऱ्हाडे, तेजस्विनी टाकळकर आदि शिक्षकांनी विशेष परिश्रम दरम्यान विस्ताराधिकारी जीवन कोकणे, केंद्रप्रमुख दत्तात्रय गोसावी,सरपंच सुजाता टाकळकर, उपसरपंच कारभारी टाकळकर, व्य.स. अध्यक्ष आकाश टाकळकर, उपाध्यक्ष वैजयंता थिटे, सदस्य रामकृष्ण टाकळकर, कैलास  टाकळकर, गीताराम टाकळकर  निलेश टाकळकर,अचल टाकळकर, सुषमा टाकळकर,गायत्री ढोरे, सुचिता टाकळकर,संदीप टाकळकर, प्रवीण टाकळकर, स्वप्निल टाकळकर, नीलम थिटे, कोमल टाकळकर,अजित राळे,  राजाराम टाकळकर यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती