निमगाव येथे हेल्थ मेळाव्याचे आयोजन
दावडी. सदाशिव अमराळे.
दावडी (वार्ताहर):- निमगाव येथे गुरुवार (दि. ८) रोजी दावडी उपकेंद्र अंतर्गत हेल्थ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा लाभ ६० नागरिकांनी घेतला
हेल्थ मेळाव्यात रक्तदाब व मधुमेहाची तपासणी करण्यात आली.
रक्तदाब व मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले असून आपल्या दैनंदिन जीवनशैली मध्ये कुठले बदल केले तर आपण या आजारापासून वाचू शकतो या विषयी माहिती समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्नेहा कोटुरवार ह्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितली.
कॅन्सरची लक्षणे आणि त्यांचे प्रकार ह्याविषयी माहिती दिली.
महिला मध्ये होणारे अंडाषयाचा कॅन्सर, आणि स्तनाचा कॅन्सर ह्यांच्याशी निगडित रक्त तपासणी तसेच तीव्र रक्तक्षय असणाऱ्या महिलांची रक्ताची तपासणी करण्यात आली. यावेळी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत आभा कार्ड व गोल्डन कार्ड काढण्यात आले.
एकूण 60 लाभार्थ्यांनी ह्या सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रमात विद्यमान सरपंच बाबडाबाई नथु भालेराव , माजी सरपंच संतोष शिंदे यांनी भेट दिली व ग्रामीण भागात शेतकरी वर्गापर्यंत असे मेळावे पोहोचले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कॅम्प यशस्वी हॊण्यासाठी आरोग्यसेवक राजेंद्र कोळी, महेंद्र शिंदे आणि आशा स्वयंसेविका जयश्री शिंदे, उज्वला गावडे, शीतल ओव्हाळ, कांचन दिघे, नीलम जाधव यांनी परिश्रम घेतले.
---------------------------------------------