प्रा. सुरेश गुजराथी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान
--------------------------------------------
किरण खुडे
राजगुरूनगर : (वार्ताहर ) : दसा श्रीमाली वैष्णव गुजराथी समाजाच्या महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळाच्या वतीने राजगुरूनगर येथील प्रा. सुरेश गुजराथी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सोहळा नाशिक येथे साजरा करण्यात आला. अशी माहीती येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र गुजराथी यांनी दिली. रोख अकरा हजार रुपये स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सी.जे. गुजराथी व सचिव राजाभाई गुजराथी उपस्थित होते.
सुरेश गुजराथी हे सेवानिवृत्त प्राध्यापक असून अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. तसेच विविध सामाजिक संस्थांना त्यांनी आर्थिक मदत दिली असल्याचे संयोजकांनी यावेळी सांगितले. समाजाच्या उपेक्षित घटकांना मदत करण्यासाठी भावी काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी गुजराथी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वस्त दिलीप गुजराथी, हेमंत गुजराथी, उज्वल नवसारीकर, समीर गुजराथी व आयोजन समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले.
--------------------------------------------------------