राजगुरुनगर (प्रतिनिधी):- राज्यस्तरीय विज्ञान मेळावात समृध्दी राऊत हिचा तिसरा क्रमांक मिळविला आहे.
राज्यस्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा 2024 -25 दिनांक 21 सप्टेंबर रोजी सर सी. व्ही. रमण सभागृह, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे पार पडला.या मेळाव्याचे उद्घाटन अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. व्ही.जी. ठाकरे हे होते.
उद्घाटन सत्राला मार्गदर्शन करतांना अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी सध्याचे युग हे ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे असून ह्या विषयावर शाळा स्तरावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होणे गरजेचे आहे.तर पहिली क्रांती कृषी क्रांती, दुसरी क्रांती माहिती तंत्रज्ञानाची तर तिसरी क्रांती ए आय ची आहे.असे असे मत त्यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
यावर्षी कृत्रिम बुध्दिमत्ता संभाव्यता व आवाहने हा मेळाव्याचा मुख्य विषय होता. राज्यस्तरावर विद्यार्थीनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले.अमरावती येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी कु.समृद्धी संजीवकुमार राऊत हिने सादरीकरण करून तृतीय क्रमांक मिळविला.आहे.या वेळी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॅाफी देऊन सन्मानित करण्यात आले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय प्राचार्य डॉ. व्ही.जी. कोरपे हे होते. यावेळी राज्य विज्ञान संस्थेच्या संचालक डॉ.हर्षलता बुराडे, अमरावती डाएटचे प्राचार्य मिलिंद कुबडे, अकोला डाएटचे प्राचार्या रत्नमाला खडके, शिक्षणाधिकारी (योजना) निखिल मानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. बद्दल व तिला मार्गदर्शन करणाऱ्या कन्या विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका डॉ. वैशाली सुनिल झगडे यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षलता बुराडे, संचालन स्वप्नील अरसळ, प्रवीण राठोड यांनी तर आभार डॉ पंकज नागपूर यांनी मानले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. दीपक झटाले, प्रा.आर. एस. मावळे , प्रा. योगेश हुषारे यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकारी, विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विज्ञान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.