राजगुरुनगर (प्रतिनिधी):-खेड तालुक्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय साहित्य साधने मोजमाप शिबिर संपन्न.झाले.
पुणे जिल्हा परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे आयोजित, पंचायत समिती खेड शिक्षण विभाग समावेशित शिक्षण खेडचे गटशिक्षणाधिकारी मा .अमोल जंगले शिक्षण विस्तार अधिकारी मा.जीवन कोकणे,सोनाली झिंजुर्डे, व पुणे जिल्हा परिषद पुणे चे जिल्हा समन्वयक मा. ज्ञानदेव देवकाते, यांच्या मार्गदर्शनाखाली-फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स कंपनी शिरूर व CSR अंतर्गत खेड तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य देण्याकरिता मोजमाप शिबिर दि.26/09/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकण न 1 येथे घेण्यात आले. सदर शिबिरात कर्णदोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, बौद्धिक अक्षमता प्रवर्गातील 71 दिव्यांग विद्यार्थ्यांची त्यांच्या गरजेनुसार तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून श्रवण यंत्र , व्हीलचेअर , कॅलिपर , मॉडीफाय चेअर, TLM किट इत्यादी साहित्य साधनांसाठी संदर्भित करण्यात आले.जिल्हा परिषद पुणे समावेशित शिक्षण विभागाचे जिल्हा समन्वयक मा . ज्ञानेश्वर देवकाते यांनी दिव्यांग विद्यार्थी व पालक यांच्याशी संवांद साधला .सदर तपासणी शिबिरास फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव कंपनीचे सीएसआर व्यवस्थापक श्री अमोल फटाले,व त्यांची अलिम्को टीम यांचे सहकार्य मिळाले. शिबिराचे नियोजन समावेशित शिक्षण विशेष साधन व्यक्ती व विशेष शिक्षकांनी केले. विशेष साधन व्यक्ती प्रतिभा भांगे, अब्दुलसल्लाम शेख,विशेष शिक्षक उज्वला सांडभोर, सुचित्रा घुगे, साधना उभे, ज्ञानेश्वर अप्पाणे, विषय तज्ज्ञ विजय दहिफळे, दयानंद शिंदे यांनी शिबिरास उपस्थित राहून पालकांना मार्गदर्शन केले .यावेळी जि.प.शाळा.चाकण मुख्याध्यापिका सुनीता तीतर, व शिक्षक वृंद यांचे सहकार्य मिळाले उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फियाट इंडिया ऑटोमोबाईल कंपनी मार्फत खाऊ देण्यात आला.