*गरीब अनाथ रुग्णांच्या अन्नदानासाठी मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्त दिला मदतीचा हात*
राजगुरुनगर (प्रतिनिधी):-मुलाच्या वाढदिवसाचा खर्च कमी करून उद्योजक अनिल डुबे यांनी गरीब रुग्णांच्या अन्नदानासाठी दिला निधी.
राजगुरुनगर रेटवडी येथील फोटोग्राफर व उघोजक अनिल डुबे यांनी समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतुन आपल्या कृष्णा या लाडक्या मुलाच्या वाढदिवसाचा खर्च कमी करुन पुणे येथील रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेला पाच हजाराची देणगी देऊन गरिब व अनाथ रुग्णांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला.
रिअल लाईफ रिअल पिपल हि पुण्यातील सामाजिक संस्था वाय सी.एम रुग्णालयातील गरीब अनाथ रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना दररोज मोफत दोन वेळचे जेवन देण्याचे काम करते. राजगुरुनगर रेटवडी येथील उद्योजक व फोटोग्राफर अनिल डुबे हे राजगुरुनगर पाबळ रोड येथे फोटोग्राफीचा व्यवसाय करत आहे.आपण समाजाचे काही देणे लागतो समाजातील दिनदुबळ्या अनाथा लोकांना आपण काही तरी मदत केली पाहीजे या उद्देशाने त्याने आपल्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवसाचा खर्च कमी करुन अनाथ व गरीब रुग्णांना मदत करणा-या पुणे येथील रिअल लाईफ रिअल पिपल या संस्थेला पाच हजाराचा धनादेश देऊन उतराई होण्याचा प्रयत्न केला.रियल लाईफ रियल पीपल या संस्थेचे प्रमुख मोहम्मद हुसेन यांनी तो स्वीकारला त्यांच्या या कार्याने त्यांच्या नातेवाईक व मिञमंडळी कडुन त्यांच्या कार्या बद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.उद्योजक अनिल डुबे व उद्योजक विजय डुबे यांच्या नव्याने सुरु करण्यात आलेल्या आधुनिक एल इ डी स्क्रीन व्यवसायाचे उदघाट्न मा.जि.प. सदस्य अतुल देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी उपसभापती सतीश राक्षे,मा. उपसभापती पंचायत समिती ज्योतीताई अरगडे राजगुरूनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक गणेश थिगळे, रेटवडी गावचे उपसरपंच दिलीप डुबे,माजी सरपंच द्वारकानाथ टिजगे, उद्योजक नंदुशेठ वाडेकर आदि मान्यवर व मिञ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते