हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सुभाष उर्फ बाळासाहेब सांडभोर
राजगुरुनगर : (प्रतिनिधी) सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संस्था, हुतात्मा राजगुरु सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षपदी सुभाष ऊर्फ बाळासाहेब सांडभोर यांची व सचिवपदी अमर टाटीया यांची एक मताने निवड झाली. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची २०२५-२७ या दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी बाळासाहेब सांडभोर, उपाध्यक्षपदी नाझनीन शेख, सचिवपदी अमर टाटीया, सहसचिवपदी शिल्पा बुरसे, खजिनदारपदी राजेंद्र जांभळे, कार्याध्यक्षपदी मीनाक्षी पाटोळे व कायदेशीर सल्लागार पदी ऍड. साधना बाजारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
"मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा" या सेवाभावी दृष्टीने संस्थेने आत्तापर्यंत अनेक बेवारस मनोरुग्णांना स्वगृही किंवा सेवाभावी संस्थांमध्ये पाठवून त्यांचे पुनर्वसन केले आहे. गरिबांना किराणा वाटप तसेच नवीन कपडे वाटप, वृक्षारोपन, गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप, सफाई कामगारांना स्वेटर वाटप, थंडीमध्ये गरजूंना ब्लॅंकेट वाटप, दिवाळीमध्ये दुर्गम भागातील गरजूंना नवीन कपडे व फराळ वाटप, गोशाळेतील मुक्या जनावरांना चारा वाटप अशी सेवाभावी कामे संस्था करीत आहे.
सांगली व सातारा चिपळूण येथील पूरग्रस्तांना भरीव अशी मदत, दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा, मुली व महिलांसाठी संरक्षणाचे धडे देण्यासाठी पारंपारिक शस्त्र लाठी-काठी चे प्रशिक्षण देणे, कोरोना काळात रक्तदान, मोफत भोजनालय, दुर्गम भागात किराणा किट वाटप तसेच बचत गटातील गरजू महिला भगिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी फाऊंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भव्य सखी मेळावा आयोजन असे अनेक स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. फाऊंडेशनचे संचालक दर महिन्याला सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत जमा करीत असतात. सदर उपक्रम राबविताना राजगुरुनगर मधील दानशूर व्यक्तींची सुद्धा मदत फाऊंडेशन कडे जमा होत असते. समाजातील गरजूंना योग्य ठिकाणी योग्य मदत पोहचत असल्याने खेड तालुक्यातून, पुणे जिल्ह्यातून तसेच परदेशातील दानशूर व्यक्तींनी सुद्धा मदत जमा केलेली आहे.समाजातील दुर्लक्षित घटकासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून या पुढील काळात देखील काम केले जाणार आहे. सामाजिक कामात पुढाकार घेत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर यांनी सांगितले.वार्षिक सर्वसाधारण सभेला दिलीप होले, संगीता तनपुरे, बाळासाहेब सांडभोर, सुनील वाळुंज, डॉ. नीलम गायकवाड, अमर टाटीया, राजन जांभळे, ऍड. मनीषा पवळे, ऍड. सचिन वाळुंज, मीनाक्षी पाटोळे, मधुकर गिलबिले गुरुजी, राहुल मलघे, शिल्पा बुरसे, आकाश बोंबले, नाझनीन शेख, राहुल वाळुंज, संपदा सांडभोर, ऍड. साधना बाजारे, उत्तम राक्षे आदि संचालक उपस्थित होते.