*गुंडाळवाडी शाळेचा जिल्हास्तरीय हॅकेथॉन उपक्रमामध्ये द्वितीय क्रमांक*
राजगुरुनगर (प्रतिनिधी) :- गुंडाळवाडी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभाग पुणे, शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे, ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर्स , लीडर शिप फॉर एकविटी, कोड टू इंहॅन्स लर्निंग यांच्या सौजन्याने अनप्लग्ड ऍक्टिव्हिटी आयोजित करण्यात आलेली, त्यात जिल्ह्यातील ४४६८ विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला.यात १० शिक्षकांची ३० विद्यार्थ्यांची प्लग्ड ऍक्टिव्हिटीसाठी निवड झाली.
या ऍक्टिव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला निर्माण झालेली समस्या व त्यावरील उपाय यावर आधारित आपापले स्क्रॅच प्रोजेक्ट सादर केले. यात सिद्धी संजय शिंदे, दिशा संजय जैद, अमृता मुरलीधर भोर या गुंडाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी १० शाळांमधून द्वितीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पदवीधर शिक्षिका सुरेखा ठोके (निकुंभ) यांनी मार्गदर्शन केले.त्यांना मुख्याध्यापक मिरा मिंडे व शाळेतील सर्व स्टाफने सहकार्य केले.
प्रकल्प निवड करणाऱ्या मूल्यांकन समितीचे सदस्य डायट संस्थेचे प्राचार्य महेश शेंडकर साहेब,कोड टू इंहांस लर्निग चे CEO श्री इरफान लालानी सर LFE चे सीनिअर मॅनेजर श्री तुषार झा सर यांच्या हस्ते शाळेला १ स्मार्ट टीव्ही, तीन टॅब, एक अलेक्सा मॉडेल फिजीकल किट, प्रमाणपत्र, मेडल, दोन संदर्भ पुस्तके व ५०० रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
शाळेच्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे साहेब, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले साहेब, विस्तार अधिकारी जीवन कोकणे साहेब,बाजीराव माकर साहेब, केंद्रप्रमुख विजय सुरकुले साहेब.व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक गुंडाळ व सर्व ग्रामस्थांनी कौतुक केले.