देशपातळीवरील किल्ला स्पर्धेमध्ये भैरवनाथ विद्यालय दोंदे यांचा तृतीय क्रमांक
कडूस,ता.३: भारतीय पुरातत्व विभाग व किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या देशपातळीवरील किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये दोंदे (ता. खेड) येथील भैरवनाथ विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे अशी माहिती मुख्याध्यापिका डॉ. नंदा भोर यांनी दिली. दिवाळीमध्ये राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक जम्मू येथील आर्मी पब्लिक स्कूलला तर द्वितीय क्रमांक आसाममधील सुकलाई येथील विवेकानंद केंद्र विद्यालयाला मिळाला.
या स्पर्धेमध्ये सहभागी होताना भैरवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक गुंठ्यामध्ये लोहगडाची प्रतिकृती तयार केली होती. या कामी उपशिक्षिका शोभा भोंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. त्यांना के.डी. पोखरकर, के.डी. भगत, वर्षा कुमठेकर, उषा लोहकरे, रोहिणी कदम, दत्तात्रय जोशी
यांनी सहकार्य केले. एक जानेवारीला किल्लेदार फिरंगोजी नरसाळा प्रतिष्ठानच्या वतीने चाकणमधील संग्रामदूर्ग येथे शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील, आमदार महेश लांडगे, माजी खासदार प्रदीप रावत यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
युनेस्को त्या जागतिक वारसा स्थळांमध्ये पुणे जिल्ह्यातील गड किल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या किल्ला बांधणी स्पर्धेमध्ये ही ग्रामपंचायत गटात या किल्ल्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
विद्यार्थी व शिक्षकांच्या या यशाबद्दल दोंदे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मारुतराव बारणे, उपाध्यक्ष अॅड. पी. यु. कोहिनकर, सचिव नंदकुमार कोहिनकर, सहसचिव भरत उढाणे, खजिनदार आनंदराव कदम, संचालक शामराव बारणे, खंडेराव करंडे, बाळासाहेब मंडलिक, मच्छिंद्र सुकाळे,
किसन लगड, प्रविण मेहेत्रे, डॉ. राजेश बनकर, सुदर्शन कदम यांनी अभिनंदन केले.