विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळकरवाडी शाळेस दोन फॅन व एक हेड माइक भेट
राजगुरुनगर (वार्ताहर):- जिल्हा परिषद आदर्श पीएम श्री केंद्रशाळा टाकळकरवाडी मधील इयत्ता चौथीचे विद्यार्थी श्लोक संतोष माळी व वरद संतोष माळी या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आई-वडिलांनी शाळेस दोन दर्जेदार ऑल पंखे तसेच वर्गातील विद्यार्थी संख्या अधिक असल्याने शिक्षकांना अध्यापन करताना सुलभता यावी यासाठी एक हेड माईक भेट दिला*
या प्रसंगी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय रामकृष्ण टाकळकर,उपाध्यक्ष सुषमा टाकळकर, मुख्याध्यापिका संजीवनी चिखले तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप टाकळकर, वैजयंता थिटे, सुचिता टाकळकर, वर्ग शिक्षक श्री सुरेश आदक सौ.मंदा आदक संतोष माळी व ग्रामस्थ,शिक्षक विद्यार्थी, मोठ्या उपस्थित होते.
शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे दोन्ही विद्यार्थी व माळी परिवाराचे आभार मानण्यात आले*