राजगुरुनगर (वार्ताहर) :- प्रथितयश वर्तमानपत्र एजन्सी व्यावसायिक नंदकुमार गुलाबचंद कर्नावट ( वय ६८ ) यांचे आज ( १९ मे ) रात्री १० वाजण्याच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांचा संध्याकाळी ७.१५ वाजता राजगुरुनगर एस. टी. बस स्थानकाजवळ एस. टी. बसच्या धडकेने अपघात झाला होता. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
आय.टी. व्यावसायिक कल्पेश कर्नावट आणि पत्रकार सिद्धेश कर्नावट यांचे ते वडील,होते.
एक हसत मुख सर्वांना हवी हवीशी वाटणारी व्यक्ती गेल्याने राजगुरुनगर वासिय हळहळ व्यक्त करत आहे.