राजगुरुनगर(प्रतिनिधी):- राजगुरुनगर येथील विद्यासागर इंग्लिश मेडीयम स्कुल मध्ये एक विद्यार्थी एक झाड असा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
विद्यासागर इंग्लिश मेडीयम स्कुल हे राजगुरुनगर मध्यील एक नामांकित इंग्रजी माध्यम विद्यालय आहे. या विद्यालयात विद्यार्थांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी विद्यालयात विविध उपक्रम नेहमीच राबविण्यात येतात.विद्यासागर स्कुल हे जरी इंग्लिश माध्यामाची शाळा असली तरी या शाळेत भारतीय संस्कृतीचे,व परंपरा, जतन व रक्षण केले जाते तसेच महाराष्ट्राचे विविध सण,उत्सव शाळेत नियमित साजरे केले जातात.त्यामुळे विद्यार्थांना महाराष्ट्राचे सण उत्सव,व भारतीय संस्कृती,व परंपराचे ज्ञान प्राप्त होते.यासर्व बाबीमुळे या शाळेत एक आदर्श व गुण संपन्न विद्यार्थी तयार होतात.
या शाळेने नुकताच एक अभिनव उपक्रम राबवून एक विद्यार्थी एक झाड असा उपक्रम शाळेत राबवुन शाळेच्या आवारात विविध प्रकारच्या वृक्षाचे व फळा फुलांच्या रोपण,करण्यात आले.व या वेळी विद्यार्थांनी पर्यावरणाचे पासुन होणारे फायदे तोटे या विषयावर पटनाथ सादर करुन समाज प्रबोधन व जागृतीचे करण्याचे काम केले.
या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या संचालिका श्रद्धा शिंदे,यांनी केले.दरम्यान संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल कोरडे,अजय थिगळे,मधुकर भवार,तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन निरंजन कोरडे यांनी तर आभार मंजु चौधरी यांनी मानले..