आळंदी(ता.खेड) येथील आर जे इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये बालचंमुनी दहीहंडी उत्सव साजरा.केला.
राजगुरुनगर.:-आळंदी - सौ. गिताबाई विनायकराव भुतेकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित 'राजमाता जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल ' चऱ्होली खुर्द आळंदी येथे दहीहंडी फोडण्यात आली. या निमित्ताने शाळेचा परिसर सजवण्यात आला होता. राधाकृष्ण व बालगोपालांच्या वेशात सजून आलेले विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्याचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. दहीहंडी फोडल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि पालकांना प्रसाद वितरित करण्यात आला.या वेळी शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.