चैतन्य संस्थेचा ३३ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
राजगुरुनगर,(वार्ताहर) सोमवार 25 ऑगस्ट 2025 रोजी चैतन्य संस्थेचा 33 वा वर्धापन दिन राजगुरुनगर येथे विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते व विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा प्रमुख भाग म्हणून दोन दिवसांचे कार्यकर्ता क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील विविध विभाग प्रमुख सहभागी झाले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन मान्यवर वक्त्यांनी केले.
यावेळी डॉ. सुधा कोठारी (संस्थापक विश्वस्त, चैतन्य)सुरेखा श्रोत्रीय ( अस्थापना विश्वस्त, चैतन्य) कल्पना पंत (कार्यकारी संचालक, चैतन्य) पी. उषा राणी (विश्वस्त, चैतन्य) डॉ. कटारिया (विश्वस्त, चैतन्य मा. कौशल्या थिगळे (व्हर्टिकल प्रमुख, इन्स्टिट्यूशन बिल्डिंग अँड मायक्रो फायनान्स ) अनंता मस्करे (व्हर्टिकल प्रमुख, स्ट्रेन्थनिंग लाईव्ह लीहूड अँड फॉरेस्ट राइट्स )रेश्मा मुथा (CEO, सारथी) सुषमा मनकर (COO, सारथी) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना संघटनात्मक क्षमता, महिलांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी, तसेच बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
विशेष सत्रात मा. प्रमोदजी झिंजाडे, (विधवा सन्मान सोहळ्याचे प्रणेते) व सिद्धार्थ चव्हाण (सल्लागार, मॉडेल स्कूल, राजगुरुनगर) यांनी महिलांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून उपजीविका कशी उभी करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी स्नेह मिलनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला. या वेळी विविध संस्था, मान्यवर व कार्यकर्त्यांचे परिवार यांनी भेट देऊन चैतन्यच्या कार्याचा आढावा घेतला व शुभेच्छा दिल्या.चैतन्यची वाटचाल, चैतन्य संस्थेची सुरुवात राजगुरुनगर येथे झाली. महाराष्ट्रातील पहिला बचत गट संघ – “ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ” हा चैतन्य प्रेरित असून तो ही राजगुरुनगर मध्येच स्थापन झाला होता. याबद्दल अनेक मान्यवरांनी कौतुक व्यक्त केले.
“इवलेसे रोप लावली दारी, त्याचा वेणू गेला गगनावरी” या ओळीप्रमाणे चैतन्यचे कार्य खेड तालुक्यातून सुरू होऊन आज महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या चार राज्यांमधील सुमारे १,४०,००० महिलांपर्यंत पोहोचले आहे.
सध्या चैतन्य संस्था खालील चार महत्त्वाच्या वर्टिकल्सवर काम करीत आहे. इन्स्टिट्यूशन बिल्डिंग अँड मायक्रो फायनान्स,जेंडर इक्विटी अँड कौन्सिलिंग सेंटर,स्ट्रेन्थनिंग लाईव्हलीहूड अँड फॉरेस्ट राइट्स, वुमन एंटरप्राईज डेव्हलपमेंट,
या कार्यात चैतन्य प्रेरित अजून चार संस्थाही सक्रियपणे कार्यरत आहेत. सारथी (Sarathi) – महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना आर्थिक पाठबळ देणे, स्वावलंबी बनवणे व स्वावलंबी फेडरेशन उभारणे.वाईस तांत्रिक सहाय्य व सॉफ्टवेअर सपोर्ट उपलब्ध करून देणे.कला मैत्री -ही एक संस्था तसेच वस्त्रउद्योगाशी निगडीत ब्रँड आहे. येथे विविध कपडे (कुर्ती, जॅकेट्स, बॅग्स इत्यादी) तयार केले जातात. महिलांना शिवणकाम, उत्पादन, विक्री व मार्केटिंगच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याचे कार्य या संस्थेमार्फत केले जाते. संगिनी - या संस्थेद्वारे कार्यकर्त्यांची क्षमता बांधणी करते तसेच बाह्य संस्थांनाही प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत.