राजगुरुनगर.(वार्ताहर) :-चिखलगाव तालुका खेड येथील आदर्श व्यक्तीमत्व व शुन्यातुन विश्व निर्माण करणारे आदर्श शेतकरी.भागुजी लक्ष्मण गायकवाड.(बुआ)वय वर्ष 70 यांचे दिर्घ। आजाराने मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजता दु:खद.निधन झाले.
भागुजी गायकवाड हे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात बुआ गायकवाड या नावाने प्रसिध्द होते.त्यांच्या ट्रान्सपोर्ट व्यवसायामुळे संपुर्ण तालुक्यात परिचित होते.
त्याच्या पाश्चात वैभव भागुजी गायकवाड,जीवन भागुजी गायकवाड हि दोन मुले व राजगुरुनगर ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या मनिषा बाळासाहेब सांडभोर हि मुलगी तर खेड तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर (जावई)जगन्नाथ,देवराम,हे दोन भाऊ तर कलाबाई,शांताबाई या दोन बहीणी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे .भागुजी गायकवाड यांच्या निधनाने पश्चिम भागातील नागरिक हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार दिनांक 4 सप्टेबर रोजी चिखलगाव ता.खेड पविञ आराळा नदी तीरावर सकाळी 8.30 वाजता संपन्न होईल.