राजगुरुनगर.(वार्ताहर):- खेड तालुका (मातृसंस्था)पञकार संघाच्या अध्यक्षपदी अँड निलेश बाळासाहेब आंधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
खेड तालुका पञकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा 26 जानेवारी रोजी शासकिय विश्रामगृह पुणे नाशिक हायवे येथे दुपारी पार पडली.या वेळी पञकार संघाचे सचिव किरण खुडे यांनी मागील सभेचे इतिवृत वाचन केले.त्या सर्वानुमते मान्यता देण्यात आली.यावेळी नविन अध्यक्ष निवडी बाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान अँड निलेश आंधळे,आदेश भोजणे,व रोहिदास होले,यांनी इच्छा व्यक्त केली.यावेळी तीनही इच्छुक उमेदवारांनी आपसाआपसात विचार विनिमय करुन अँड निलेश आंधळे यांच्या नावाची घोषणा केली.त्यामुळे निलेश आंधळे यांनी खेड तालुका पञकार संघाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची घोषणा मावळते अध्यक्ष संजय शेटे,व सचिव किरण खुडे यांनी केली.
यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारणी पुढील.प्रमाणे.
खेड तालुका पत्रकार संघाची सन २०२६-२७ कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
१) अध्यक्ष : ॲड. निलेश बाळासाहेब आंधळे
२)उपाध्यक्ष :आदेश भोजने,अतुल भालेराव
३) कार्यकारी अध्यक्ष : इसाक मुलाणी
४) सचिव : किरण खुडे
५) खजिनदार : प्रभाकर जाधव
६) सह सचिव : रोहिदास होले
७) प्रसिद्धी प्रमुख : नाजिम इनामदार
८) कायदेशीर सल्लागार : ॲड. सोमनाथ नवले
९) सल्लागार :- सुनिल थिगळे,बाळासाहेब सांडभोर,विद्याधर साळवे.वनिता कोरे,
या वेळी माजी अध्यक्ष महेद्र शिंदे, राजेंद्र लोथे,दत्ता भालेराव,रोहिदास घाडगे रामचंद्र सोनवणे, किशोर गिलबिले,सदाशिव अमराळे,अशोक कोरडे,महादेव पाखरे,सुभाष लोहट,आदी पञकार या प्रसंगी उपस्थित होते.