कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर पार पोहोचले;
पेट्रोल-डिझेलवरही परिणाम होण्याची शक्यता !
मुंबई ( प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमतीनं विक्रमी उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर काय परिणाम झाला आहे? 6 सप्टेंबरसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. 6 सप्टेंबर रोजी अपडेट करण्यात आलेल्या यादीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. 6 सप्टेंबरलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत.
देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल स्थिर
दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
राज्यातील शहरांत दर काय ?
पुणे : पेट्रोल 106.31 प्रति लिटर, डिझेल 92.82 रुपये प्रति लिटर
नाशिक : पेट्रोल 106.77 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
रत्नागिरी : पेट्रोल 108.05 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.52 रुपये प्रति लिटर
सिंधुदुर्ग : पेट्रोल 107.98 रुपये प्रति लिटर, डिझेल 94.46 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर : पेट्रोल 106.55 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.08 रुपये प्रति लिटर
नागपूर : पेट्रोल 106.24 रुपये प्रति लिटर, डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
गोंदिया : पेट्रोल 107.23 रुपये प्रति लिटर, डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर