कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्यात,
पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार ?
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचा दर 84 प्रति बॅरलच्या आसपास नोंदवला जात होता, मात्र आज 30 ऑगस्ट रोजी सकाळी कच्च्या तेलाच्या दरांत आणखी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड तेल 85 डॉलरच्या पुढे नोंदवलं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावरच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) निश्चित केल्या जातात. मात्र, देशात तेलाच्या किमतींचा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. आज म्हणजेच, 30 ऑगस्ट रोजी अपडेट झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनुसार, आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही.
कच्च्या तेलाची किंमत
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सकाळी, 30 ऑगस्ट रोजी, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 85.68 डॉलरवर आहे. तसेच, WTI क्रूड प्रति बॅरल 81.43 डॉलरवर पोहोचलं आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
दिल्ली, मुंबईसह इतर महानगरांमधील दर काय ?
देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, येथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 96.72 आणि डिझेलची किंमत 89.62 प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटरनं विकलं जात आहे.