आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 आंतरराष्ट्रीय

शी जिनपिंग यांनी दिल्लीतील G20 परिषदेकडे अचानक फिरवली पाठ

रिपोर्टर   31-08-2023 13:32:54   369

शी जिनपिंग यांनी दिल्लीतील G20 परिषदेकडे अचानक फिरवली पाठ 

 

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : सप्टेंबर महिन्याच्या ९ व १० तारखेला राजधानी दिल्लीत G20 परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपस्थित राहणार असल्याचं आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलती समीकरणं व त्यात जी२० परिषदेतील देशांनी घ्यावयाची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे. या बैठकीला आधी शी जिनपिंग येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, आता अचानक त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली असून त्यांच्याजागी चीनचे पंतप्रधान ली क्वांग येणार असल्याचं सांगितलं जात आहे

म्हणून बैठकीकडे पाठ फिरवली ?

दक्षिण आशियातील बदलती समीकरणं, भारत-चीन संबंध, रशिया-यु्क्रेन युद्ध अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, चीनच्या परराष्ट्र विभागाने नुकत्याच जारी केलेल्या देशाच्या नकाशात अक्साई चीन, लडाख व अरुणाचलचा काही भाग चीनच्या हद्दीत दाखवण्यात आल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना खोडा घातला गेला आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र विभागानं आपली नाराजी कळवली असली, तरी त्याचे पडसाद यंदाच्या जी२० परिषदेत उमटण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर शी जिनपिंग यांनी बैठकीकडे पाठ फिरवण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती