भ्रष्टाचाऱ्यांना उलटं टांगून सरळ करणार;
अमित शहा यांची सिंहगर्जना
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूपेश बघेल सरकारविरोधात 'आरोपपत्र' जारी केलं आहे. केवळ भाजपच छत्तीसगडला काँग्रेसच्या लूट, अत्याचार आणि कुशासनापासून वाचवू शकते, असंही शहा यांनी म्हटलं.
भूपेश बघेल यांनी छत्तीसगडला गांधी घराण्याचे 'एटीएम' बनवून राज्याला विकासाच्या वाटेवरून बाजुला नेले. छत्तीसगडमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना उलटे लटकवून सरळ केले जाईल, असा इशाराही शहा यांनी दिला.
भूपेश बघेल सरकारविरोधात आरोपपत्र जारी करताना अमित शहा म्हणाले की, छत्तीसगडचा विकास व्हावा म्हणून त्याला वेगळे ठेवण्यात आले. मात्र २०१८ मध्ये स्थापन झालेल्या बघेल सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याऐवजी लुटीचे सरकार स्थापन केले. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व 11 जागा जिंकू. मात्र केंद्रात मोदी सरकार स्थापन होण्याआधी छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल. मी छत्तीसगडच्या जनतेला वचन देतो की, भाजप सत्तेत आल्यास दोन वर्षांत प्रत्येक घरात शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल.