आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 व्यक्ती विशेष

थेशी थॉमस मिसाईल वूमन

रिपोर्टर   24-08-2023 12:04:19   1691

    🌻 *आनंदी पहाट* 🌻

 

      *🛰🚀 चांद्रयान-३ 🚀🛰*

     

       *दिव्य यशाच्या अभिमानाची*

 

        *दि. २३ ऑगस्ट २०२३. वेळ सायंकाळी ६.०४ वाजताची. समस्त भारतीयांची हृदये धडधडत होती. श्वास रोखले गेले होते. एकेक क्षण महत्त्वाचा होता. आणि.. आणि तो सुवर्ण क्षण आला. भारतीयांचा उर अभिमानाने भरुन आला. देशातील प्रत्येक राज्यात.. प्रत्येक गल्लीबोळात स्वयंस्फुर्त घोषणा निनादल्या 'भारत माता की जय.. !!' लोक अत्यानंदाने एकमेकांचे अभिनंदन करु लागले. हातात तिरंगा फडकावत जनतेने आनंद व्यक्त केला. देशप्रेमाचे.. बंधुभावाचे.. एकात्मतेचे दर्शन जगाला घडले. हवाहवासा अनोखा उत्सव साजरा झाला. भारतच नाही तर जगाच्या दृष्टीने ऐतिहासिक असा 'विक्रमा' चा दिवस ठरला.*

        *भारतीय शास्त्रज्ञांच्या बौद्धिक क्षमतेचे.. वर्षानुवर्षे केलेल्या कठोर परिश्रमाचे.. आत्मविश्वासाचे चीज झाले. चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झाले. दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला. अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सेफ लँडिग करणारा भारत चौथा देश ठरलाय.*

        *देशाचा इतिहास हजारो वर्षाचा असतो. स्वातंत्र्या नंतरची ही ७५ वर्षे हा तर अत्यल्प काळ. शिवाय प्रचंड लोकसंख्या. मग स्वातंत्र्यत्तोर काळात स्वतःला सावरण्यात.. पायावर उभे करण्यात हा काळ पुरत नाही. पण या अल्पकाळात लोकशाही असलेल्या १४० कोटी जनतेच्या देशाने सर्वच क्षेत्रात जे दैदीप्यमान यश प्राप्त केलेय. तर यामध्ये अंतराळ क्षेत्राचा सिंहाचा वाटा आहे. यशस्वी चांद्रयान-१ आणि मंगळयान मोहिमेनंतरचे हे मोठे यश. या यशाचे श्रेय देशातील आजपर्यन्तच्या सर्वच वैज्ञानिकांच्या दूरदृष्टीला आहे.*

        *जे शब्दही जगाला ठाऊक नव्हते त्यासर्व ग्रहांची मांडणी आजही सर्वच प्रांतातील पुरातन भारतीय मंदिरात कोरलेली आहे.. आढळते. आज विज्ञान युगात आमच्याशी भावनिक नाते असलेला दूरवरचा चंद्र कवेत घेतलाय. या अभूतपूर्व यशाने भारताची मान जगात उंचावलीय. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांनाही देशातील वैज्ञानिकांचा सार्थ अभिमान वाटला. अगदी त्रिभूवनात हा आनंदी आनंद पसरलाय.*

        *स्वबळावर चंद्रालाही गवसणी घालण्याचे सामर्थ्य आमच्या वैज्ञानिकांनी सिद्ध केलेय. महिलांचे ह्यात योगदान हे तर फारच महत्वाचे. इथल्या युवापीढीला सदैव प्रगतीच्या नव्या वाटा गवसतात. जगाला स्तिमीत करणारे असे महाकाय पराक्रम या देशाकडून सदैव घडावेत, विक्रमांचा इतिहास रचला जावा, देशाचे हे यशवैभव असेच वृद्धींगत व्हावे हीच आमची मनोकामना.. प्रार्थना.*

        *समस्त इस्त्रो आणि अन्य भारतीय वैज्ञानिकांचे 'चांद्रयान-३' या यशस्वी मोहिमे बद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा !!*

        *"आमची प्रगतीची शिखरे ही जगाच्या कल्याणार्थच..।

 

  *आनंदी आनंद गडे,*

  *इकडे तिकडे चोहीकडे*

 

  *वरती खाली मोद भरे,*

  *वायूसंगे मोद फिरे*

  *नभांत भरला, दिशांत फिरला,*

  *जगात उरला*

  *मोद विहरतो चोहीकडे*

 

  *सूर्यकिरण सोनेरी हे,*

  *कौमुदी ही हसते आहे*

  *खुलली संध्या प्रेमाने,* 

  *आनंदे गाते गाणे*

  *मेघ रंगले, चित्त दंगले,* 

  *गान स्फुरले*

  *इकडे, तिकडे, चोहीकडे,* 

  *आनंदी आनंद गडे*

 

  *वाहती निर्झर मंदगती,* 

  *डोलती लतिका वृक्षतती*

  *पक्षी मनोहर कुजित रे,* 

  *कोणाला गातात बरे*

  *कमल विकसले, भ्रमर गुंगले,*

  *डोलत वदले*

  *इकडे, तिकडे, चोहीकडे,* 

  *आनंदी आनंद गडे।

 

  *गीत : बालकवी*  ✍

  *संगीत : पं. हृदयनाथ मंगेशकर*

  *स्वर : लता मंगेशकर*

 

               🇮🇳 *जयहिंद

 

पोर्टलवर व्यक्ती विशेष मध्ये घ्यावी

 

*👆🏻दिसायला काकूबाई वाटत असल्या तरी त्या कुणी सामान्य गृहिणी किंवा निवडणुकीला उभ्या राहिलेल्या कोणी उमेदवारही नाहीत. अफाट आणि अचाट कर्तुत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॊमस, एक असे नाव जे तुम्ही कधीच ऐकले नसणार. कदाचित पुढेही कधी ऐकणार नाहीत. कारण मिडिया अशा लोकांना कधीच प्रसिद्धी देत नाही. त्यासाठी आपले क्रिकेटपटू आणि सिनेस्टार त्यांच्या दिमतीला आहेतच.*

 

*🌹 डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण " मिसाईलमन " म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थोमसना " मिसाईल वुमन " म्हणून ओळखतात. टेसी थोमस " भारतीय अंतराळ संशोधन संस्थे " ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अंड डेवलपमेंट ऑर्गनायाजेशनमद्धे त्या कार्यरत आहेत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने " अग्नी " क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थोमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला माझा त्रिवार सलाम !*

 

*🌹 केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसाना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तीचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाउन पोहोचल्या.तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख " अग्निपुत्री " म्हणूनही झाली.*

 

*आज ४९ वर्षे वय असलेल्या ट्रेसी थोमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यानाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार राहावे लागत असूनही आपल्या हाताने बनविलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. कदाचित त्यासाठी सैफ आली खान नावाचा तद्दन भिकार अभिनेता अधिक लायक ठरत असावा.*

 

*🌹 मित्रानो, टेसी थोमस यांची कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आणि आजही महिलांना " पानी कम " समजणाऱ्या फेसबुकवरील असंख्य महाभागांना एक सणसणीत चपराक ठरावी ज्यांनी मला अनेक वेळा नाउमेद करून माझे पाय खाली खेचायचा प्रयत्न केला. आज इस्रोमद्धे तब्बल बाराशे महिला शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी त्यांची ती अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी शंकाच नाही. जय हिंद💐


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती