हॉकीपटू मेजर ध्यानचंद
किती कमनशिबी आहोत आपण की या जादूगाराला आपण खेळताना बघू शकलो नाही ! भारताचा आजपर्यंतचा सर्वात अप्रतिम हॉकीपटू मेजर ध्यानचंद हा या देशात जन्माला आला हे मात्र आपलं परमभाग्य !! ज्याच्या हॉकी स्टिक ला एकदा चेंडू चा स्पर्श झाला की तो चेंडू ध्यानचंद ठरवेपर्यंत त्या स्टिक ची साथ सोडत नव्हता. ध्यानचंद काही जादू टोणा करतो का, त्याच्या स्टिकला चेंडू चिकटून राहील असा त्याने काही पदार्थ स्टिक ला लावला आहे का इ नाना शंका घेतल्या गेल्या. पण कुठल्याही स्टिक चा वापर करून तीच किमया साध्य होत होती. त्या नन्तर मात्र, या अवलिया चा भक्त होण्या व्यतिरिक्त इतर अन्य कोणतेही मार्ग त्याच्या विरोधी खेळाडुकडे नव्हते. असे म्हणले जाते की हिटलर देखील त्याच्या खेळाने इतका प्रभावित झाला होता की त्याने ध्यानचंद ला त्याच्या देशाचे नागरिकत्व घेण्याची विनंती केली होती व सोबत गलेलठ्ठ पगार व भत्ते देऊ केले होते. पण या देशभक्ताने ही विनंती नम्रपणे फेटाळली. आपल्या देशाला त्याने विजय आणि सुवर्णपदकाची सवय लावली होती. एकहाती सामना ताब्यात घेण्याचे त्याचे कौशल्य थक्क करणारे होते. सत्तर मिनिटांच्या खेळात 'सबकुछ ध्यानचंद' अशी परिस्थिती असायची. ध्यानचंद ही जणू एक दन्तकथा आहे. भारताच्या त्या नन्तर च्या सगळ्या हॉकी खेळाडूंचा एकचआदर्श आहे आणि तो म्हणजे ध्यानचंद. या खेळाडू चा या पूर्वीच भारतरत्न पुरस्काराने सन्मान करणे गरजेचे होते. या पुरस्काराचीच शोभा त्यामुळे वाढली असती. पण सगळीकडे राजकारण आणायची सवय असणाऱ्या आपल्या सर्व राजकीय पक्षांना अजून हा सुज्ञपणा आलेला दिसत नाही. हा पुरस्कार त्यांना मिळो न मिळो, करोडो लोकांच्या हृदया मध्ये वर्षानुवर्षे ध्यानचंदच अधिराज्य गाजवणार, हे मात्र नक्की ! जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!!