#संयुक्तमहाराष्ट्राच्याचळवळीत
आपल्यापोवाड्यांनी मराठी माणसाची अस्मिता जागविणारे शाहीरअमर शेख यांचे आज पुण्यस्मरण (२० ऑक्टोबर १९१६— २९ ऑगस्ट १९६९)
मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. आईचे नाव मुनेरबी. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्घ वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरुंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व ⇨ मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करु लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले. राष्ट्रीय चळवळीत ते १९३०—३२ च्या सुमाराससामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला(१९४७).स्वतः एकश्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आकमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रुपयांचा निधी देशासाठी गोळा केला. अधिकमाहीतीसाठी मराठीविश्वकोश
#शाहिरांचीएकरचना
डोंगरी शेत माझं ग, मी बेनू किती?
आलं वरीस राबून, मी मरू किती?
कवळाचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?
गवताचा भारा बाई ग, घेऊन चढावं किती?
आडाचं पाणी बाई ग, पाणी वडावं किती?
घरात तान्हा बाई ग, तान्हा रडंल किती?
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?
आलं आलं वरीस जमीन नांगरून
उभं पीक नाचे सोन्यानं फुलवून
पर एक मेला सावकार कोल्हा
हिसकून घेतो बाई, सोन्याचा गोळा
उपाशी राहून ग, आम्ही मरावं किती?
म्हागाईनं बाई, घातला हैदोस
गळा आवळी बाई, बेकारी फास
कुनाचे देऊ आन् कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्स जातील किती?
अक्षय र्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रूप नवं आणू महाराष्ट्र भूला
जुलमाचे काच रावणी फास, एकीचं निशाण हाती