आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 क्राईम विभाग

पुण्यात अल्पवयीन मुलांकडून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

रिपोर्टर   02-09-2023 16:10:41   254

पुण्यात अल्पवयीन मुलांकडून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

 

पुणे ( प्रतिनिधी ) : पुण्यातील वानवडी परिसरात तरुणाचा टोळक्याने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी पहाटे काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे वानवडी परिसरात मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या खुनाचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही आहे. 

  महादेव रघुनाथ मोरे असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी मुलांना ताब्यात घतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही सगळी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

पुण्यात गुन्हेगारीचा वाढता आलेख

काहीच दिवासांपूर्वी पुण्यात चाकूने वार करत तरुणाची  दहा ते बारा जणांनी मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना पुण्यातील मंगला टॉकीज परिसरात 15 ऑगस्ट रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास घडली होती. चित्रपट पाहून बाहेर पडताना या तरुणावर वार करण्यात आले होते. नितीन मस्के असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव होतं. नितीन चित्रपट गृहातून बाहेर पडला. त्यावेळी त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले होते. यामध्ये नितीन मस्के याचा जागीच मृत्यू झाला होता. तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशी हत्यारे घेऊन दहा ते बारा जणांनी घेरून मस्के यांची हत्या केली होती.

क्षृल्लक कारणावरुन हत्या

सध्या पुण्यात क्षृल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात. त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याबरोबरच बलात्कार, सायबर क्राईम आणि लैंगिक छळांच्या घटनेत देखील वाढ होत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंग सक्रिय आहेत. त्यातील कोयता गॅंगने सध्या पुण्यात धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता पुण्यात एकापाठोपाठ एक क्षृल्लक कारणावरुन हत्या केल्याचं समोर आलं आहे. 

 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती