आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 क्राईम विभाग

एअर होस्टेसच्या हत्येने मुंबई शहर हादरलं, 23 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

रिपोर्टर   04-09-2023 12:59:32   516

एअर होस्टेसच्या हत्येने  मुंबई शहर हादरलं,

23 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ !

 

मुंबई ( प्रतिनिधी ) :  मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईतील पवई भागात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आला आहे. एका 23 वर्षीय तरूणीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. मृत तरूणी ही हवाई सुंदरी अर्थात एअर होस्टेस  म्हणून काम करत होती अशी माहिती समोर आली आहे. राहत्या घरात तिचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, रुपल ओगरे असे मृत तरूणीचे नाव असून ती 23 वर्षांची होती. ती मूळची छत्तीसगडच्या, रायपूर येथील रहिवासी होती. मात्र सध्या ती मुंबईतील मरोळ येथील एक इमारतीतील फ्लॅटमध्ये रहात होती. तिच्यासोबत तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्सही होते. तिची गळा चिरून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

   घटनेच्य दिवशी रूपल घरात एकटीच होती. तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्स हे गावी गेल्याने तिच्यासोबत घरी कोणीच नव्हते. तिचे कुटुंबीय तिला बऱ्याच काळापासून कॉल करत होते, मात्र ती फोन उचलत नव्हती. अखेर त्यांनी तिच्या मैत्रिणीला फोन करून ती ठीक आहे ना हे बघण्यास सांगितले. तिची मैत्रीण तिच्या घरी पोहोचली. बराच वेळ दार वाजवल्यानंतरही कोणीच उघडले नाही. अखेर दरवाजा तोडून ती आत घुसली असता रुपल मृतावस्थेत आढळली. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पवई पोलीस आणि क्राईम ब्रांचचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

   

   


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती