आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 क्राईम विभाग

पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय टिळक रोडवर MPSCच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

रिपोर्टर   06-09-2023 16:36:28   2051

पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रिय

टिळक रोडवर MPSCच्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला

 

पुणे ( प्रतिनिधी ) :  पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गँगची दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वीच एका मुलीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी एका विद्यार्थ्याने आपला जीव धोक्यात घालून तरुणीला वाचवलं होतं. आता पुन्हा एकदा पुण्यात कोयता गँगची दहशत दिसून आली.

 

पुण्यातील टिळक रोडवर एमपीएसस ची तयारी कऱणाऱ्या तरुणावर तीन तरुणांनी  कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी पानमळा परिसरातून तिघांना अटक केली. आज पहाटे ही घटना घडली होती.या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पुण्यातील कोयता गँगचा मुद्दा विधीमंडळात देखील गाजला होता. त्यानंतर कोयत्याच्या घटनांना ब्रेक लागला होता. मात्र आता पुन्हा एकदा कोयता गँगने  डोक वर काढत असल्याचं स्पष्ट होतंय.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


नॅशनल मराठी न्यूज़
vXmbOypi 02-10-2024 03:04:04


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती