Apr 28 2025 20:54:39
आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 इतर खेळ

बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा आर.प्रज्ञानानंद दुसरा भारतीय खेळाडू

रिपोर्टर   22-08-2023 15:19:30   402

बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा आर.प्रज्ञानानंद दुसरा भारतीय खेळाडू

 

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय आर. प्रज्ञानानंद याने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या बुद्धीबळपटूचा पराभव करत बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत (FIDE World Cup Chess Tournament) मजल मारली आहे. बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरत प्रज्ञानानंदने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंधाने सोमवारी फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला. अवघ्या 18 वर्षांच्या ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदकडे आता सर्वांच्या नजरा आहेत.

  भारतीय बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. या विजयासह प्रज्ञानानंदने 2024 कँडिडेट्स स्पर्धेच्या यादीत आपले स्थान निश्चित केलं आहे. बॉबी फिशर आणि मॅग्नस कार्लसन यांच्यानंतर कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणारी प्रज्ञानानंद हा तिसरा सर्वात तरुण खेळाडू आहे. पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हे आतापर्यंत कँडिडेट्सच्या स्पर्धेत खेळलेले एकमेव भारतीय आहेत. त्यानंतर आता प्रज्ञानानंदने कँडिडेट्स स्पर्धेतही धडक मारली आहे.

   प्रज्ञानानंदने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबियानो कारुआनाचा  टायब्रेकरमध्ये 3.5-2.5 असा पराभव केला. बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रग्नानंदाचा सामना आता जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या मॅग्नस कार्लसनशी होणार आहे. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा प्रज्ञानानंद हा दुसरा भारतीय आहे. अंतिम फेरीत विजय मिळवत नवा इतिहास रचण्यापासून तो फक्त एक पाऊल दूर आहे.

 चार भारतीय उपांत्यपूर्व फेरीत

  या वर्षी  बुद्धीबळ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पहिल्यांदाच चार भारतीय खेळाडूंनी प्रवेश केला होता. प्रज्ञानानंदसोबत अर्जुन एरिगाईसी, डी गुकेश आणि विदित गुजराथी यांनी अंतिम आठमध्ये स्थान मिळवलं होतं.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती