भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाही
नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : जागतिक कुस्ती संघटनेने मुदतीत निवडणूक न घेतल्याने भारतीय कुस्ती महासंघाचं (Wrestling federation Of India) सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. याचा मोठा फटका भारतीय कुस्तीपटूंना बसलाय. आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू तिरंग्याखाली खेळू शकणार नाहीत. 16 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय कुस्तीपटू तटस्थ खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. ही स्पर्धा आणखी एका कारणासाठी महत्त्वाची ठरणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप पॅरिस ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय करण्यासाठीही महत्तावाची असणार आहे.
तिरंग्याखाली सहभागी होऊ शकणार नाही
भूपेंद्र सिह बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला 45 दिवसात निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या आदेशाचं पालन करण्यास समिती अयशस्वी ठरली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) कुस्तीचं कामकाज पाहण्यासाठी 27 एप्रिलला एका समितीची स्थापना केलीहोती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 एपिलला जागतिक कुस्ती संघटनेने निवडणूक मुदत वेळेत न घेतल्यास कारवाईचा इशारा दिला होता. पण यानंतरही भारतीय कुस्ती महासंघाने याकडे दुर्लक्ष केलं. परिणामी जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाची सदस्तयता रद्द केली आहे.