आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 इतर खेळ

यशप्राप्तीसाठी जिद् आणि आईवडिलांचा आर्शिवाद महत्वाचा - धनराज पिल्ले

रिपोर्टर   28-08-2023 11:10:53   402

यशप्राप्तीसाठी जिद् आणि आईवडिलांचा आर्शिवाद महत्वाचा - धनराज पिल्ले

छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : प्रत्येक खेळडूंसाठी आपल्या आई वडिलांचा आर्शिवाद महत्चा आहे. यामुळे आपणला एक मोठी ऊर्जा मिळते. आई वडिलांचे आर्शिवाद आणि जिद्द असल्यास आपण सहज मोठे यश मिळवू शकतो. या जोरावरच मी आशिया चषकात चांगली कामगिरी करुन हिंदुस्थानला सूवर्ण पदक मिळवून देऊ शकलो.  

    राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून  जिल्हा ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्‍या तब्बल ३७० खेळाडूंचा सत्कार  अर्जुन पुरस्कारार्थी, हिंदुस्थान हॉकी संघाचे यशस्वी माजी कर्णधार ऑलिम्पियन पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या हस्ते करण्यात आला. भानुदासराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात धनराज पिल्ले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्यांनी खेळाडूंना यशाचे मार्ग दाखविला. पिल्ले म्हणाले की कोणतेही काम करतांना आपल्याकडे जिद्द असणे महत्वाची आहे. जिद्दीच्या आणि आई वडिलांच्या आर्शिवादाच्या जोरावर आपण कोणतेही शिखर गाठू शकतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही स्पर्धेत खेळाल तेव्हा तुम्हाला मिळालेल्या ट्रॉफीचा सन्मान करा. ट्रॉफीला घरात असे ठेवा की आलेल्या पाहुण्याचे लक्ष ट्रॉफीवर जाईल यामुळे त्यांनी दिलेल्या आर्शिवदामुळे तुमचे मनोबल उंचावेल.

   या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिाम्पयन हॉकीपटू तथा अर्जुन पुरस्कारार्थी पद्मश्री धनराज पिल्ले, ऑलिम्पिक संघटनेचे संस्थापक सचिन मुळे, अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष बिजली देशमुख, उपाध्यक्ष डॉ. उदय डोंगरे, डॉ.मकरंद जोशी, सचिव गोविंद शर्मा, सहसचिव दिनेश वंजारे, कोषाध्यक्ष विश्वास जोशी आदंीची व्यासपीठावर उपस्थिती होती.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती