आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 इतर खेळ

नेहरू चषक हॉकी स्पर्धेमधे इंदिराबाई पाठक महाविद्यालयाचे वर्चस्व

रिपोर्टर   29-08-2023 17:50:36   423

नेहरू चषक हॉकी स्पर्धेमधे इंदिराबाई पाठक महाविद्यालयाचे वर्चस्व

 

छत्रपती संभाजी महाराज नगर ( प्रतिनिधी ) :  नेहरू चषक हॉकी स्पर्धेमधे इंदिराबाई पाठक महाविद्यालयाने मुलींच्या व मुलांच्या गटात विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रीय क्रीडा दिन्नानिमित्त हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमे पूजन करुन नेहरू चषक हॉकी स्पर्धेचे उद्घाटन मनपा आयुक्त जी.श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांची या प्रसंगी विशेष उपस्तिथी होती. या स्पर्धा जिल्हा अधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि हॉकी असोसिएशियनच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.

१५ वर्षाखालील मुलांच्या गटात

मुले: बून इंग्लिश स्कूलने होली क्रॉस इंग्लिश स्कूलचा ५-० ने पराभव केला. १७ वर्षाखालील मुलांच्या गटात इंदिराबाई पाठक महाविद्यालयाने बून इंग्लिश स्कूलचा १-० ने पराभव केला. तर १७ वर्षाखालील मुलींच्या गटात देखील इंदिराबाई पाठक महाविद्यालयाने स्प्रिंग डेल्स महाविद्यालयावर एक तर्फा विजयी मिळविला. 

या स्पर्धा यशवी करण्यासाठी मनपा क्रीडा अधिकारी संजय बालेय, क्रीडा प्रबोधिनींच्या प्राचार्या पूनम नवगिरी, हॉकी हॉकी संघटनेचे सहसचिव शामसुंदर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली शेख इम्रान, किशोर परदेशी, झाकीर खान, शेख झाहीड, शेख अमान यांनी काम पाहिले. मनपा हाधीतील एकूण १३ संघांनी या स्पर्धेमधे भाग घेतला होता.


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती