आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 इतर खेळ

डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचं सुवर्णपदक हुकलं, रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान

रिपोर्टर   01-09-2023 12:48:50   358

डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राचं सुवर्णपदक  हुकलं,

रौप्य पदकावर मानावं लागलं समाधान

 

नवी दिल्ली ( प्रतिनिधी ) : भालेफेकीत  दमदार कामगिरी करणारा भारताचा खेळाडू नीरज चोप्राला डायमंड लीगमध्ये रौप्य पदकावरसमाधान मानावे लागले. काही दिवसांपूर्वी अ‍ॅथलेटिक्स विश्वचषक बुडापेस्टमध्ये 88.17 मीटरमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे या स्पर्धेमध्येही त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पण या स्पर्धेमध्ये त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. अवघ्या काही सेंटीमीटरने नीरजची सुवर्णपदकाची संधी हुकली. डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने 85.71 मीटरचा सर्वोत्तम थ्रो केला. त्याचवेळी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या झेकच्या जेकब वडलेचने 85.86 मीटरचा थ्रो केला. नीरजकडून पहिले तीन प्रयत्न हे फाऊल झाले. त्यानंतर त्याने चौथा प्रयत्नामध्ये 85.22 मीटरचा थ्रो केला. पाचव्या प्रयत्नात देखील नीरजने फाऊल केला. नीरज त्याच्या शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात 85.71 मीटरचा थ्रो करण्यात तो यशस्वी ठरला. 

पॅरिस ऑलिम्पिकसाठी नीरज चोप्रा पात्र.....

जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केल्यानंतर नीरज हा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे नीरजच्या नावावर आणखी एक विक्रम रचला जाण्याची शक्यता या माध्यमातून वर्तवण्यात येत आहे. तर या रौप्य पदकाच्या कामगिरीनंतर नीरजच्या यशामध्ये आणखी एका पदकाची भर पडल्यामुळे त्याचं सर्व स्तरातून कौतुक केलं जातयं. 

नीरजची सुवर्ण कामगिरी

नीरज चोप्राने जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं. त्याने या स्पर्धेत 88.17 मीटरचा थ्रो केला. हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात यंदाच्या अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. नीरजने दुसऱ्या फेरीनंतर स्पर्धेत दमदार कमबॅक केलं. त्याने दुसऱ्या फेरीनंतर  88.17 मीटरचा थ्रो केला. त्याचवेळी जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या फेरीत 85.79 चा थ्रो करुन रौप्य पदकाचा मानकरी ठरला. 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती