आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 क्रिकेट

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट, पल्लेकेले स्टेडिअमच्या खेळपट्टीला कव्हर्सने झाकले

रिपोर्टर   02-09-2023 14:42:41   272

भारत-पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट, 

पल्लेकेले स्टेडिअमच्या खेळपट्टीला कव्हर्सने झाकले 

 

पल्लेकेले ( प्रतिनिधी ) : भारत आणि पाकिस्तान हायहोल्टेज सामन्यावर पावसाचे संकट ओढावले आहे. दुपारपासून कँडीमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पल्लेकेले स्टेडिअमवर पावसाने लंपडाव सुरु केला आहे. पावसामुळे पल्लेकेले स्टेडिअमच्या खेळपट्टीला कव्हर्सने झाकण्यात आले आहे. दुपारी दीड वाजल्यापासून पल्लेकले येथे जोरदार पाऊस सुरु झाला आहे. खेळपट्टी खराब होऊ नये म्हणून मैदानाच्या स्टाफने कव्हर्स मैदानावर टाकले आहेत. सकाळपासून पल्लेकेले येथे रिमझिम पाऊस सुरु होता. पण एक वाजल्यापासून पावसाने जोर धरला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामन्यात पावसाने खोडा घातल्यास अनेक क्रीडा प्रेमींची निराशा होऊ शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार वर्षांनंतर एकदिवसीय सामना होत आहे. 

   भारतीय संघ सामन्यासाठी हॉटेलवरुन पल्लेकेले स्टेडिअमर पाहचला आहे. पण ताज्या अपडेटनुसार, पावसामुळे खेळपट्टीवर कव्हर्स टाकण्यात आले आहे. खेळपट्टी आणि आजूबाजूचा भाग कव्हर्सने झाकण्यात आला आहे. पावसाने विश्रांती घेतली नाही, तर नाणेफेकीलाही उशीर होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे झाला नाही, तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण दिला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषकात होणारा सामना महत्वाचा आहे, कारण पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाची दोन्ही संघ तयारी करत आहे. या सामन्याची मागील चार वर्षांपासून चाहते वाट पाहत आहे.

   पाकिस्तान क्रिकेट संघही स्टेडिअममध्ये पोहचला आहे. पाकिस्तानचा आशिया चषकातील हा दुसरा सामना असेल. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने नेपाळचा 238 धावांनी दारुण पराभव केला होता. या सामन्यात कर्णधार बाबर आझम याने दमदार 151 धावांची खेळी केली होती. तर इफ्तिखार अहमद याने नाबाद 109 धावांचे योगदान दिले होते. त्याशिवाय शादाब खान याने चार विकेट घेतल्या होत्या. भारताविरोधातील सामना पावसामुळे रद्द झाला तर पाकिस्तानचा संघ सुपर 4 साठी पात्र होईल.

सामना रद्द झाल्यास काय ? 

मुसळधार पावसामुळे सामना रद्द झाल्यास भारत आणि पाकिस्तान संघाला प्रत्येकी एक एक गुण दिले जातील. अशा स्थितीमध्ये पाकिस्तानचा संघ सुपर ४ साठी पात्र होईल.  दुसरीकडे भारताला साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकावाच लागणार आहे. आशिया चषकातील भारताचा अखेरचा साखळी सामना नेपाळविरोधात आहे.  नेपाळचा पराभव केल्यासच भारताचा सुपर ४ मध्ये प्रवेश होईल.   

पावसामुळे व्यत्यय आल्यास काय ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात डकवर्थ लुईस नियमांचा वापर होण्याची दाट शक्यता आहे. वनडे सामन्याचा निकाल लागण्यासाठी कमीत कमी २०-२० षटकांचा खेळ होणं, अनिवार्य आहे.  कँडी येथे शनिवारी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता 60 टक्के पावसाची शक्यता आहे

.  

 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती