पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने टॉस जिंकला
पल्लिकल ( प्रतिनिधी ) : भारताचा कर्णधार रोहित शर्माने हायहोल्टेज सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह याचे टीम इंडियात कमबॅक झालेय. तर दुसरीकडे पाकिस्तानने नेपाळविरोधातील विजयी संघ मैदानात उतरवला आहे. नाणेफेकीनंतर बोलताना बाबर आझम याने प्रथम फलंदाजी करायची होती, असे सांगितले. रोहित शर्माने मोक्याच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आता सामना कोणत जिंकणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. मोहम्मद शामी याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालेले नाही. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या जोडीला शार्दूल ठाकूर याला स्थान दिलेय. मध्यक्रममध्ये श्रेयस अय्यर याचे कमबॅक झालेय. पाकिस्तानच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारताची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पाकिस्तानची प्लेईंग 11
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी