नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल,
या सामन्यात जसप्रीत बुमरा खेळणार नाही
पल्लिकल ( प्रतिनिधी ) : नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारताने टॉस जिंकला. रोहितने टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहित शर्माने या सामन्यात नेमके काय बदल केले हे त्याने सांगितले. जसप्रीत बुमरा हा या सामन्यात खेळणार नसल्याचे रोहित शर्माने सांगितले.या सामन्यासाठी भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला. या सामन्यात जसप्रीत बुमरा खेळणार नाही, कारण तो भारतात परतला आहे. रोहितच्या जागी आता भारतीय संघात मोहम्मद शमीला संधी देण्याचा निर्णय रोहित शर्माने घेतला आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना जर पावसामुळे रद्द झाला तर काय होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. हा सामना जर पावसामुळे रद्द करण्यात आला तर दोन्ही संघांना समान गुण दिले जातील. त्यानुसार गुणतालिकेत भारताचे दोन गुण होतील आणि नेपाळच्या खात्यात एक गुण असेल. त्यामुळे भारत हा सुपर ४ फेरीसाठी पात्र ठरेल. त्यामुळे पाऊस पडला तरी भारत सुपर ४ फेरीत जाऊ शकतो. हा सामना जर भारताने गमावला तर त्यांचे आव्हान मात्र संपुष्टात येऊ शकते.
भारताची सोमवारी आशिया कप वन-डे क्रिकेट स्पर्धेत नेपाळविरुद्ध लढत होत आहे. ही लढत जिंकून भारताचे सुपर-४ मध्ये प्रवेश करण्याचे लक्ष्य असेल. भारताची स्पर्धेतील सलामीची पाकिस्तानविरुद्धची लढत पावसामुळे रद्द झाली होती. त्यामुळे भारताला एकाच गुणावर समाधान मानावे लागले आहे. 'अ' गटातून पाकिस्तानने यापूर्वीच सुपर-४मध्ये प्रवेश केला आहे.
भारताने सलामीच्या लढतीत पाकिस्तानविरुद्ध निराशा केली होती. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला ४८.५ षटकांत २६६ धावांतच रोखले होते. रोहित शर्मा (११), शुभमन गिल (१०), विराट कोहली (४), श्रेयस अय्यर (१४) झटपट माघारी परतले होते. त्यामुळे भारताची १४.१ षटकांत ४ बाद ६६ अशी स्थिती झाली होती. ईशान किशन (८१ चेंडूंत ८२) आणि हार्दिक पंड्याने (९० चेंडूंत ८७) भारताचा डाव सावरला. मात्र, ही जोडी फुटली आणि रवींद्र जडेजा (१४), शार्दूल ठाकूर (३), कुलदीप यादव (४) यांना अधिक वेळ मैदानावर टिकाव धरता आला नाही. त्यामुळे भारताला पूर्ण पन्नास षटकेही फलंदाजी करता आली नाही. आता दुबळ्या नेपाळविरुद्ध धावांचा पाऊस पाडण्याची संधी भारतीय फलंदाजांना आहे.