आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 क्रिकेट

टीम इंडिया नव्हे जर्सीवर भारत हवे, विरेंद्र सेहवागच्या ट्वीटची चर्चा

रिपोर्टर   06-09-2023 17:41:14   739

टीम इंडिया नव्हे जर्सीवर भारत हवे,

विरेंद्र सेहवागच्या ट्वीटची चर्चा 

 

मुंबई ( प्रतिनिधी ) : देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या अधिकृत राजपत्रावर प्रथमच प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केला.  त्यावरुन प्रतिक्रियांची एकच रांग लागली. सर्वसामान्य लोकांपासून ते राजकीय कलाकारांच्या प्रतिक्रियेत आता क्रीडा क्षेत्राचीही भर पडली आहे. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग यानेही भारत आणि इंडिया या वादात उडी घेतली आहे. टीम इंडिया नव्हे जर्सीवर भारत असे नाव असायला हवे, असे ट्वीट विरेंद्र सेहवाग याने केलेय. सेहवागच्या ट्वीटची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सेहवाग याने या ट्वीटमध्ये जय शाह यांनाही टॅग केलेय. 

   विश्वचषकासाठी आज भारतीय संघातील 15 शिलेदारांच्या नावाची घोषणा झाली. बीसीसीआयने केलेल्या ट्वीटला रिप्लाय करत सेहवाग याने आपले मत मांडलेय. सोशल मीडियावर भारत विरुद्ध इंडिया असा सोशल मीडिया ट्रेंड झालाय. विश्वचषकात आपण विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजासाठी चीअर्स करणार आहोत. जर्सीवर इंडिया नव्हे तर भारत लिहिलेले असायला हवे, असे सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. 

टीम इंडिया नव्हे टीम भारत

विश्वचषकात आपण विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजासाठी चीअर्स करणार आहोत. भारतीय संघाच्या जर्सीवर टीम इंडिया नव्हे तर भारत लिहिलेले असायला हवे. कारण, आपल्या हृदयात भारत आहे. खेळाडूंच्या जर्सीवर भारत लिहिलेले असायला हवे, असे ट्वीट विरेंद्र सेहवाग याने केलेय. 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती