आवाज जनमताचा. राष्ट्रहिताचा!
 दिनविशेष

 क्रिकेट

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची ब्लॅकने विक्री ?

रिपोर्टर   07-09-2023 11:44:53   627

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची ब्लॅकने विक्री ?

 

मुंबई ( प्रतिनिधी ) : क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणजे सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक.5 ऑक्टोबरपासून सुरु होणारा वर्ल्ड कप आणि त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हणजे क्रिकेट फॅन्ससाठी पर्वणीच. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सामन्याचा थरार 14 ऑक्टोबरला रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याची तिकिटांची विक्री आणि तिकिटांची किंमत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलीय. 

   काही संकेतस्थळावर या सामन्याच्या एका तिकिटाची किंमततब्बल 57 लाख दाखवत असल्याचा दावा क्रिकेटप्रेमींनी केला आहे. त्यापाठोपाठ इतरांनीही आपल्या तिकीट खरेदीचा अनुभव आणि ऑनलाईन तिकिटाचे स्क्रिनशॉट्स शेअर केलेत. त्यात काही तिकिटांची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त तर काही तिकिटांची किंमत दोन लाखांपेक्षा जास्त दिसत आहे. ऑफिशियल साईटवरील तिकिटं काही मिनिटात संपली. मात्र आता या काही साईट्सवर अव्वाच्या सव्वा किंमतीत ही तिकिटं उपलब्ध असल्याचं दिसतंय. 

  हे ब्लॅकने तिकीट विक्रीचा प्रकार सुरु असल्याचा आरोप क्रिकेटप्रेमी करत आहेत. यावरुन अनेकांनी बीसीसीआय आणि बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांना टॅग करत तक्रारही केली आहे. महत्त्वाचं म्हणजे माजी कसोटीवीर वेंकटेश प्रसाद यानेही या प्रकारावर भाष्य केलं आहे. 1 लाख क्षमतेच्या स्टेडियममध्ये फक्त साडे आठ हजार तिकिटं विक्रीसाठी ठेवणं हा अन्याय असल्याचं सांगत बीसीसीआय यात आणखी पारदर्शकता आणेल अशी आशा वेंकटेश प्रसादने व्यक्त केलीय. 

 

 

 

 


जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती